उष्णता तसेच अतिनील किरणांमुले त्वचा काळवंडते.पण त्वचेची चमक परत मिळवण्यासाठी, टॅनिंग काढण्यासाठी तुम्हाला पार्लर मध्ये जाण्याची किंवा वेगळी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही . यावर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता.टॅनिंगमुळे स्किन डल दिसू लागते.आज आपण घरच्या घरी टँनिंग कमी करण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.
लिंबाचा रस घेऊन त्यात मधाचे काही थेंब टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. लिंबू ब्लीचिंग एजंट म्हणून काम करेल आणि त्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. मध त्वचेला सूथ आणि काल्म करण्यास मदत करते.
टोमॅटो हे एक ट्राइड अँड टेस्टेड स्किन डी-टॅनिंग घटक आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. जे कोलेजनचे उत्पादन सुधारते आणि सन बर्नपासून संरक्षण करते. टोमॅटोचा थोडा रस घ्या आणि त्वचेच्या टॅन झालेल्या भागावर लावा. १५ मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. हे आठवड्यातून तीन वेळा करा.
त्वेचचा पोत सुधारण्यासाठी आणि टॅन काढून टाकण्यासाठी हे गोल्डन कॉम्बीनेशन आहे. दोन चमचे बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि काही थेंब लिंबाचा रस आणि दूध टाका. हे त्वचेवर लावा आणि धुण्यापूर्वी कोरडे होऊ द्या. हा पॅक केवळ तुमची त्वचा उजळणार नाही तर अँटी एजिंग एजंट म्हणूनही काम करेल.
पपईतील पॅपेन एन्झाइम त्वचेला हलके करेल आणि टॅन दूर करेल. थोडी पपई मॅश करून त्यात मध टाकून स्मूथ पेस्ट बनवा. चेहरा आणि इतर टॅन केलेल्या त्वचेच्या भागांवर लागू करा आणि ड्राय झाल्यानंतर धुवा.
या याशिवाय दररोज सनस्क्रीन वापरत रहा आणि दुपारच्या काळात उन्हात जाणे टाळा. एकदा तुम्ही घरी आलात की तुमची त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चरायझ करायला विसरू नका.
(टीप:वरील बातमी ही सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









