Hemant Marathe, deputy sarpanch, inaugurated the tug of war tournament at Malewad
मळेवाड जकातनाका येथील रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते झाला. श्री माऊली कला क्रिडा मंडळ, मळेवाड नाईकवाडी कडून रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, रमाकांत नाईक, विलास नाईक, उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना हेमंत मराठे यांनी श्री माऊली कला क्रिडा मंडळाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच अशा स्पर्धामुळे गावातील नवोदित खेळाडूंना एक दर्जा मिळून खेळाडू तयार होण्यासाठी अशा गावात आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच या व्यतिरिक्त अन्य स्पर्धा या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केल्या जातात. त्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. मंडळाला आमचे नेहमीच सहकार्य लाभले असे आश्वासन केले. तर बाळा शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना स्पर्धेला शुभेच्छा देत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू नाईक यांनी केले.
न्हावेली / वार्ताहर









