आमदार आसिफ सेठ यांची जनतेच्या समस्येसाठी उपाय योजना
बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांचे आता लवकरच निवारण होणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२३ च्या प्रचारादरम्यान काँग्रेसने अनेक गॅरंटी योजनांसोबत अनेक जनहित योजना जाहीर केल्या होत्या. त्याप्रमाणे बेळगाव उत्तरचे काँग्रेस उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी देखील बेळगाव उत्तर विभागातील जनतेसाठी समस्या त्वरितगतीने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेसाठी हेल्पलाईन (९६८६६७६२१७, ९६८६६७६२१८, ९३८६६७६२१९ आणि ९६८६६७६२२०)चे लोकार्पण करण्यात आले असून, यामध्ये पाणी, ड्रेनेज, वीज, रस्ते व आरोग्यासंबंधी जनतेच्या तक्रारी सुलभरित्या नोंदविल्या जाणार आहेत.

याकरीता देण्यात येणाऱ्या हेल्पलाईनशी संपर्क साधले असता त्या संबंधित खात्याशी संपर्क करून निर्देश दिले जातील. यामध्ये जनता,अधिकारी आणि आमदार हे त्या हेल्पलाईनशी जोडलेले असतील. दररोज सायंकाळी यासंबंधी अधिकाऱ्यांच्याकडून रिपोर्ट घेतला जाणार असून सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत या हेल्पलाईन द्वारे आपण तक्रारी नोंदवू शकता.









