पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत
३५ शेतकरयांना मिळाला लाभ
आचरा प्रतिनिधी
चिंदर गावात अज्ञात आजाराने आतापर्यंत ३५ शेतकरयांची एकूण ४३ गुरे दगावली होती. ऐन शेतीच्या हंगामातच ओढवलेल्या या संकटातून शेतकऱ्यांना तातडीने मदत देत भारतीय जनता पक्षा तर्फे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दोन लाखा पेक्षा जास्त मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकट काळात भाजपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मायेचा हात देण्यात आला आहे. अन्य स्वरूपातही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, प्रभारीसरपंच दीपक सुर्वे, जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, प्रकाश मेस्त्री, मंगेश गांवकर, संतोष गांवकर, अरविंद घाडी, मनोज हडकर, बाबू कदम यासह चिंदर येथीलशेतकरी उपस्थित होते.
ऐन शेतीच्या हंगामातच चिंदर गावात अज्ञात आजाराने ४३गुरे दगावली होती. भारतीय जनतापार्टी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी याची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पर्यंत ही गोष्ट पोहोचवली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुचनेनुसार पशुवैद्यकीय पथक चिंदर गावात तातडीने उपलब्ध होत उपचार सुरू केले होते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पिडीत शेतकऱ्यांना दोन लाख दहा हजाराची तातडीने आर्थिक मदत देत संकटात मायेचा हात दिला आहे. मंगळवारी सायंकाळी चिंदर ग्रामपंचायत येथे या मदतीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
पॉवर ट्रीलर भाडे तत्वावर उपलब्ध करून देणार : धोंडू चिंदरकर
चिंदर गावात अज्ञात आजाराने अनेक गुरे दगावली आहेत. शेती हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देताना ज्यांचे बैल मृत झाले त्यांना शेतीसाठी भाजपच्या माध्यमातून पॉवर ट्रीलर भाडे तत्वावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. अन्य स्वरूपातही मदत केली जाणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्ह्या बँक संचालक बाबा परब यांनी दिली.









