रूग्णांच्या उपचारावर 71 कोटी 68 लाख ऊपये वितरित; कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालापचे आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे काम चांगल्या प्रकारे सुऊ आहे. हा कक्ष पुन्हा सुऊ झाल्यापासून गेल्या अकरा महिन्यात राज्यातील सुमारे 9 हजार 600 रुग्णांना उपचारासाठी मदत करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 71 कोटी 68 लाख ऊपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे यांनी सोमवारी येथे प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर प्रेसक्लब तर्फे आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होत. यावेळी प्रेसक्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सचिव बाबा खाडे, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेना वैद्यकिय सेनेचे संपर्कप्रमुख जितेंद्र सातव, सागर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
चिवटे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात मृतावस्थेत असलेला हा कक्ष गेल्या अकरा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून पुन्हा सुरु झाला. या कक्षाच्या माध्यमातून जवळपास 20 दुर्धर व गंभीर आजारांसाठी ऊग्णांना 50 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. यामध्ये कॅन्सर, हृदयरोग, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करणे, वयोवृध्दांचे गुडघ्याची व खुब्याची शस्त्रक्रीया, रस्ते अपघात जखमींवर उपचार, भाजलेले रुग्ण व विजेच्या धक्क्याने जखमी रुग्णांवर उपचार, मेंदुचे विकार, लहान मुलांचे आजार व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीया करणे आदींसाठी मदत दिली जाते.
ते पुढे म्हणाले, कक्षाकडे वैद्यकिय मदतीसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये मोठ्या संख्येने कॅन्सरवरील उपचारासाठी मागणी अर्ज येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मदत देण्याचे काम सुरु आहे. ही योजना आणखी सुलभ केली जाणार आहे. जेणे कऊन एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये,
रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
कोल्हापूरातील तपोवन मैदानावर रविवारी (दि.11) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची व रिक्षा, वडापचालकांचीही वैद्यकीय तपासणी करुन त्यांना औषधे दिली जाणार आहेत, असे मंगेश चिवटे यांनी सांगितले.
कर्णबधिर लहान मुलांसाठी ‘मिशन तरंग’
कर्णबधिर लहान मुलांवर शस्त्रक्रीया करण्यासाठीही आता मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षातून 2 लाख ऊपये दिले जाणार आहेत. त्याला ‘मिशन तरंग’ हे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर ट्रस्टच्या माध्यमातून 4 लाख रुपयेही मिळवून दिले जाणार आहेत. जेणेकऊन या शस्त्रक्रीयेसाठी येणारा 6 लाख ऊपये खर्चाचा भार त्या मुलाच्या कुटूंबियांवर पडणार नाही, असे चिवटे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करा
चिवटे म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे काम पूर्णपणे पारदर्शी आहे. याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णांनी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तसेच चुकीच्या पध्दतीने काम कऊन योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या रुग्णालयांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेसंदर्भात कोणतेही रुग्णालय रुग्णांना सहकार्य करत नसेल, तर त्यांनी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करावी.
योजनेच्या माहितीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांक
या योजनेची सविस्तर माहिती रुग्णांना मिळावी, यासाठी ‘8650567567’ हा टोल फ्री क्रमांक सुऊ करण्यात आला आहे. याचा रुग्ण किंवा नातेवाईकांनी वापर करावा, असे आवाहन चिवटे यांनी केले……