ऑनलाईन टीम/तरुण भारत
Uddhav Thackeray Aurangabad Visit : राज्यात परतीच्या पावसाने मराठवाड्यासह विदर्भात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हाताला आलेली पिके वाहून गेली आहेत. शेतकरी अस्मानी संकटामुळे उध्वस्त झालाय. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav ऊपोमकाीोब) हे आज मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गंगापूर (Gangapur) तालुक्यातल्या दहेगांव आणि पेंढापूर शिवारातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना ५० हजारांची तातडीनं मदत करण्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करत असून ते शेतकऱ्यांशी संवादही साधत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “काही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता रडायचं नाही आता लढायचं. संकटं येत असतात त्या संकटांना सामोरं जायचं, मी तुमच्यासोबत आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. संकटं आले तेव्हा तुम्ही एकवटा. तुमच्या हातातील आसूड हा केवळ हातात घेऊन फिरून नका, त्याचा योग्य वेळी वापरही करा.”
तसेच पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली. बळीराजा संकटात सापडलेला असून त्याला तातडीनं मदत करण्याची गरज असल्याचं ठाकरे म्हणाले. कोरोनाकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांनी संभाळलं होतं. आता आपल्याला शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांना मदतीचा हात द्यावा लागेल, असंही ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : सत्तारांच्या अनेक लफड्यांची माहिती माझ्याकडे; सत्तारांना खैरेंचे जशास तसे उत्तर
तसे; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला घाम फोडू, त्यांना तातडीनं मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, शेतकऱ्यांनी संकटकाळात धीर सोडू नये शिवसेना तुमच्या पाठिशी असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.