वृत्तसंस्था/ प्राग
रविवारी येथे झालेल्या प्राग आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या लेमी हेलने सलग दुसऱ्यांदा पुरुष विभागातील जेतेपद पटकाविले. त्याचप्रमाणे इथोपियाची बर्ट युकेन वेल्डीने महिलांच्या विभागातील अजिंक्यपद पटकाविले. 30 कि.मी. पल्ल्यांच्या या मॅरेथॉनमध्ये हेलने 2 तास 5 मिनिटे आणि 14 सेकंदाचा अवधी घेत जेतेपद पटकाविले. किपकोचने दुसरे तर जपानच्या तेतसुया योरोझिकाने तिसरे स्थान मिळविले.









