सॅक्रामेंटो :
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर महामार्गावर कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामेंटोमध्ये ही दुर्घटना घडली आहे. आकाशात झेपावतानाच हेलिकॉप्टर अचानक महामार्गावर कोसळले. हे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेत सामील होते. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सॅक्रामेंटोचे महापौर केविन यांनी सांगितले आहे.









