काठमांडू
नेपाळच्या मनांग एअरचे एक हेलिकॉप्टर शनिवारी पर्वतीय क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत वैमानिक जखमी झाला आहे. 9एन एएनजे या हेलिकॉप्टरमध्ये नेपाळच्या लोबुचेमध्ये उतरताना आग लागली होती. हे हेलिकॉप्टर प्रवाशांना आणण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या लुक्ला येथून रवाना झाले होते. वैमानिक प्रकाश सेधाई हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काठमांडू येथे हलविण्यात आले आहे. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.









