Kolhapur Alamattidam : कर्नाटक सरकार जाणीव पूर्वक अलमट्टी धरणांची उंची वाढवण्याचा घाट घालत असेल तर मोठं आंदोलन उभे केले जाईल, त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा माजी आरोग्य राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अलमट्टीबाबत निवेदन दिले आहे. तसेच त्याबाबत चर्चा देखील केली. कर्नाटक अलमट्टी धरणांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गावांना सर्वाधिक धोका आहे. त्या परिस्थितीची पूर्व कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. अशी माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
हेही वाचा- कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी
महाराष्ट्रातील कोणत्याही गावाला महापुराचा धोका निर्माण होणार नाही. याची काळजी राज्य सरकार घेईल,असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासित केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन ग्वाही दिलेली आहे की, महाराष्ट्र सरकार सोबत चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









