वृत्तसंस्था / सेऊल
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कोरीया खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बिट्रेझ हेदाद मायाने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना पोलीना कुडेरमेटोहाचा पराभव केला.
डब्ल्युटीए टूरवरील ही 500 दर्जाची महिलांची टेनिस स्पर्धा असून 2017 साली हेदाद मायाने उपविजेतेपद पटकाविले होते. शुक्रवारी येथे वारंवार पाऊस झाल्याने उपांत्य फेरीचे सामने लांबणीवर टाकण्यात आले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हेदाद मायाने शनिवारी कुडेरमेटोहाचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटस मध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. 27 वर्षीय व्हेरोनिका कुडेरमेटोहाचा सामना व्हिक्टोरिया टोमोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात व्हेरोनिकाने टोमोव्हाचा 7-5, 6-3 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. व्हेरोनिका ही पोलीनाची बहिण आहे.









