विजेता 35000 रुपये व ट्रॉफीचा मानकरी : भैरवनाथ फास्ट फॉरवर्ड उपविजेता
वार्ताहर /उचगाव
येथील वैकुंठधाम येथे पार पडलेल्या उचगाव फुटबॉल क्लब असोसिएशनच्यावतीने लक्ष्मीताई हेब्बाळकर ‘मिनिस्टर ट्रॉफी’ या फुटबॉल स्पर्धेचे मानकरी ओल्ड फाटाज यांनी पटकावून 35000 रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरले. तर द्वितीय क्रमांक भैरवनाथ फास्ट फॉरवर्ड यांनी 15000 रुपये व ट्रॉफी पटकाविण्याचा मान मिळविला. बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य जावेद जमादार, गायत्री ज्वेलर्सचे मालक राकेश बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव, सदस्या भारती जाधव व माधवराव राणे आणि नागशांती ग्रुप या सर्वांच्या हस्ते उपस्थित विजयी संघांना आणि वैयक्तिक विजेत्यांना ही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नागशांती ग्रुप यांचेकडून सायकल लकी ड्रॉसाठी ठेवण्यात आली होती. या लकी ड्रॉचे मानकरी सुमित कल्लेहोळकर, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथील इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मिळविली. यावेळी उत्कृष्ट संघांना मेडल्स युवराज कदम यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच हॉटेल रेड स्टोन आणि गायत्री ज्वेलर्स यांच्यावतीने ट्रॉफी भेटीदाखल देण्यात आल्या. बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे यांच्याकडून खेळाडूंना जर्शी भेटीदाखल देण्यात आल्या. तर शशिकांत जाधव आणि भारती जाधव यांच्याकडून फुटबॉल स्पर्धेसाठी लागणारे किड्स भेटीदाखल देण्यात आले.









