सावंतवाडी / प्रतिनिधी
Heavy turnout in District Bar Association elections
अध्यक्ष कोण ? हे एका तासानंतर होणार स्पष्ट
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक 2023 -26 साठी आज जिल्हा न्यायालय येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरुवात झाली. जवळपास 570 हून अधिक जणांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास सहाशेहून अधिक वकील मतदार आहेत. मतदानासाठी जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे . त्यानंतर मतमोजणी सुरुवात होणार आहे .सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया होत असून अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, अशा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. अध्यक्षपद व सहसचिव पदासाठी चार तर अन्य पदांसाठी प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात आहेत, सायंकाळी पाच नंतर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे ,जिल्हा बार असोसिएशनची ही निवडणूक चुरशीची होत आहे.









