पणजी : बुधवारच्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी किंचित पाऊस कमी झाला. शुक्रवारी पावसाचे प्रमाण बरेच कमी झाले. पुढील सहा दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावणेतीन इंच पाऊस मुरगावात झाला. गोव्यात शुक्रवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला. मात्र पुढील सहा दिवसांकरिता यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. बुधवारी संपूर्ण गोव्यात मुसळधार पाऊस पडला. गणेश चतुर्थी उत्सवावर विरजण पडले. शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र सकाळच्या दरम्यान गोव्यात सर्वत्र मुसळधार वृष्टी झाली व दुपारपासून पावसाचे प्रमाण ओसरले. त्यामुळे गोव्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमध्ये सुधारणा झाली. अनेक नद्यांना आलेला पूर ओसरला.
गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस
मुरगाव 2.75 इंच, धारबांदोडा 2.50, केपे 2.50, फोंडा 2.25, सांगे 2.25, पेडणे 1.75, पणजी 1.50, सांखळी 1.50, म्हापसा 1.50, काणकोण 1.25, जुने गोवे 1 इंच, दाबोळी 0.75 इंच. शुक्रवारी पणजीत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान एकूण 2 इंच पाऊस नोंदवला गेला.









