पुढील दोन दिवस पावासाची शक्यता
पणजी : संपूर्ण राज्याला शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर दिवसभरात अधूनमधून जोरदार पाऊस सुऊच होता. सायंकाळी 4 वा. च्या दरम्यान, पणजी व आसपासच्या परिसरात मुसळधार वृष्टी झाली. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद दाबोळीत 3 इंचांनी झाली. जुने गोवे येथेही तीन इंच पावसाची नोंद झाली. पणजीत 2.5 इंच तर सांखळी व मुरगाव येथे प्रत्येकी 2 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे पाउण इंच तर सांगेमध्ये अर्धा इंच पाऊस पडला. हवामान खात्याला देखील एवढा मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज नव्हता. गुऊवारी त्यांनी जे भाकीत केले होते त्यात हलक्या स्वऊपात पाऊस पडून जाईल असे म्हटले होते. मात्र गुऊवारी उत्तर रात्री गोव्यात सर्वत्रच जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी देखील राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासांमध्ये तसेच रविवारी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून हा जोरदार पाऊस अपेक्षित आहे.









