वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बुधवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते. पूर्व भागातील बसवण कुडची, कणबर्गी, कलखांब, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द आदी भागांमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली होती. मंगळवारी दुपारीही या भागात अल्पप्रमाणात पाऊस झाला होता. तर बुधवारी दुपारी जोरदार पावसाला प्रारंभ झाला व सुमारे पाऊन तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे उष्म्याने लाहीलाही झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर पूर्व मशागतीच्या कामांनाही हा पाऊस लाभदायक ठरला आहे. शिंदोळी येथे तर भर पावसामध्येच श्री महालक्ष्मी यात्रा सुरू होती.









