वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागाला मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे उष्म्याने लाहीलाही झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तालुक्याच्या पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, होनिहाळ, मोदगा, सुळेभावी आदी भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊ लागला. बघता बघता जोरदार पावसाला सुऊवात झाली. सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसापासून उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले होते. अशातच मंगळवारी सकाळपासून वातावरणात बदल निर्माण होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले व सायंकाळी पावसाने हजेरी लावली.









