प्रतिनिधी/ पणजी
राज्यात शनिवारी पावसाचा जोर एकदम मंदावला. मात्र दि. 6 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दि. 4 ते 6 जुलै दरम्यान नारंगी अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासात केपे येथे 3.5 इंच, सांगेत 3 इंच, वाळपई 2.90 इंच, काणकोण 2.5 इंच, पेडणे, फ्ढाsंडा प्रत्येकी 2 इंच, सांखळी 1.5 इंच, जुने गोवे व मडगाव येथे प्रत्येकी 1 इंच, पणजी पाऊण इंच एवढी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर शनिवारी मंदावला. पणजीत दिवसभरात केवळ 4 मि.मी. नोंद झाली. तर मुरगाव 1 से.मी. एवढी पावसाची नोंद झाली.
पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने नारंगी अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान पावसाबरोबरच राज्यात सर्वत्र जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वारे ताशी 60 कि.मी. वेगाने सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.









