वार्षिक तूट भऊन निघण्याची शक्यता : आतापर्यंत मडगाव, केपेत सर्वाधिक पाऊस
पणजी : जुलैमध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याने आणि सध्या पावसाचा जोर वाढत असल्याने या आठवड्यातच वार्षिक सरासरीची असलेली तूट भऊन काढून गोव्यात अतिरिक्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त कऊन ‘ऑरेंज अर्लट’ जाहीर केला आहे. गेल्या 24 तासांत सर्वत्र समाधानकारक पाऊस पडलेला आहे. पणजीला रात्रभर पावसाने झोडपले. एकूण 4 इंच पाऊस झाला तर मडगाव, केपे, सांगे येथे पावसाने जनजीवन विस्कळीत केलेले आहे. यंदाचा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस 43.50 इंच मडगावात नोंदविला गेला आहे. मडगावची वाटचाल इंचांच्या अर्धशतकाकडे चालू आहे. राज्यात आता पाऊस समाधानकारक आहे. 23 जूनपासून 2 जुलैपर्यंत सुमारे 23 इंचापेक्षाही जास्त पाऊस झाल्याने पाऊस वार्षिक सरासरीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंत पोहोचला आहे. सरासरीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी केवळ 5 इंच पाऊस कमी आहे. गोव्यात गेल्या 24 तासांत पावसाने झोडपून काढले. रविवारी दुपारी सुऊ झालेला पाऊस सोमवार सकाळपर्यंत जोरात सुऊ होता. सोमवारी दुपारी चक्क उन पडले आणि सायंकाळी पुन्हा पाऊस सुऊ झाला.
गोव्यात 35.50 इंज पावसाची नोंद
काल सोमवारी सकाळपर्यंत नोंद झाल्यानुसार 24 तासात 4 इंच सरासरी पाऊस पडला. यंदा पाऊस सुऊ झाल्यापासून मडगाव आघाडीवर आहे. मडगावात दररोज मुसळधार पावसाची नोंद होत आहे. यंदाच्या मोसमात गोव्यात 35.50 इंच एवढा पाऊस पडलेला असून तो समाधानकारक आहे. राज्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात पाऊस 6 इंचानी कमी पडलेला आहे. उत्तर गोव्यात अद्याप सरासरीच्या तुलनेत 20 से.मी. पाऊस कमी झालेला आहे. दक्षिण गोव्यात केवळ 5 से.मी. कमी आहे. ही तूट पुढील दोन – तीन दिवसांत भऊन निघेल, असा अंदाज आहे.
मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ इशारा
आगामी सात जुलैपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा इशारा दिलेला आहे. वादळी वाऱ्याचा वेग हा ताशी 55 ते 75 किमी या प्रमाणे वाढण्याचीही शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
सर्वाधिक नोंद केपे, मडगावात
गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद केपे येथे नोंदविली गेली. आतापर्यंत मडगावात 43.50 इंच तर केपेमध्ये 40 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसामध्ये 38 इंच पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. तर सांगेमध्ये 39 इंच पाऊस झालेला आहे.
अणजुणेचा नूर पालटला, गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणी
ज्या धरण क्षेत्रातील पावसाबाबत चिंता निर्माण झाली होती, त्या अणजुणे धरण प्रकल्पात आता पाण्याची आवक एवढी वाढत आहे की, गेल्या 24 तासात सुमारे दीड मीटरने पाणी वाढले आहे. गतवर्षी याच काळात अणजुणे धरणात 67.52 मीटर पाणी होते. यंदा ते 68.75 मीटर झालेले आहे. सध्या धरणात 275 हेक्टर मीटर अर्थात 2.75 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा जमला आहे. एकूण 93 मीटर्सचे हे धरण असून सध्या धरण क्षेत्रात असलेल्या एकूण पाण्याचा साठा पाहता केवळ 6.3 टक्के एवढेच आहे. जुलैमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याने हे धरण जुलैमध्येच निम्याहून जास्त भऊन जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये पाण्याचा धरणातून विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात अणजुणे धरण क्षेत्रात मुसळधार 4 इंच पाऊस पडला. त्यामुळे आजूबाजूच्या डोंगर कपारीतून मोठमोठाले धबधबे धरण क्षेत्रात कोसळत आहेत.









