शिराळा,प्रतिनिधी
Shirala Rain Update: शिराळा तालुक्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे धरणांसह नदी ओढ्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे.वारणा-मोरना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने तलाठी व ग्रामसेवक यांना गाव न सोडण्याचे आदेश तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी दिले आहेत. याचबरोबर शिराळा तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापना करण्यात आले आहे. याचबरोबर देववाडी, सांगाव, मांगले बोटींसह इतर साहित्य सुसज्ज ठेवण्याचे आदेश ही दिले आहेत.