सातारा : सध्या वीर धरणाच्या उजव्या कालवा विद्युतगृहातुन ११०० क्युसेक व डाव्या कालवा विद्युतगृहातुन ९०० क्युसेक नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज रात्री ८ वाजता ४६३७ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा नदीपात्रात एकूण ६६३७ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे प्रशासनाकडून नागरिकांना कळवण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा इशारही देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस संतंतधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचे २ वक्रदरवाजे १ फुट उघडून ३,१५४ क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून १०५० क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ४२०४ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा इशारा कोयना नदीपात्राजवळील गावांना देण्यात आला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









