पुणे / प्रतिनिधी :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच अरबी समुद्रातून येत असलेले बाष्प यामुळे पुढील चार दिवस कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला.
पोषक हवामानाअभावी राज्यात गेले दोन आठवडे पावसाने ओढ दिली. सध्या उत्तरपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम उत्तरपश्चिमेच्या दिशेने सरकत पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंडकडे सरकणार आहे. याबरोबरच गुजरातच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. 18 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या सर्व घटकांच्या प्रभावामुळे देशभरात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. राज्यात सोमवारपासून कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
- सोमवार ऑरेंज अलर्ट
पुणे
यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील बहुतांश जिल्हे
- मंगळवार ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे
यलो अलर्ट
पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भतील बहुतांश जिल्हे
- बुधवार ऑरेंज अलर्ट
पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, उद्रारमध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्हे
- गुरुवार ऑरेंज अलर्ट
पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, विदर्भातील बहुतांश जिल्हे








