कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोयनानगरला १५०, नवजाला २०१, तर महाबळेश्वरला १८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रति सेकंद ५९ हजार ८५१ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा चोवीस तासात चार टीएमसीने वाढला आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ५१.९३ टीएमसी झाला असून ४९.३३ टक्के भरले आहे. तर धोम बलकवडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातून कालपासून सुरू असलेला प्रतिसेकंद २०२० क्युसेक्सचा विसर्ग वाढवून २२९८ क्युसेकपर्यंत केला आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गतवर्षी २०२२ला आजच्या दिवशी कोयना धरणात ६२.७० टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण ५९.५७ टक्के भरले होते. तर २०२१ रोजी आजच्या दिवशी धरणात ८७.४६ टीएमसी पाणीसाठा होता, तर धरण ८३.०९ भरले होते.