कर्नाटकात आज मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे घडणाऱ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे. दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांसह किनारपट्टीच्या भागांना या पावसाळ्यात सर्वाधिक फटका बसला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 47 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय पुरुषाचा पावसामुळे घडलेल्या घटनांमध्ये मृत्यु झाला आहे.
पीटीआयच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, बंटवाल तालुक्यातील साजीपामुन्नूर गावातील नंदावारा परिसरात शुक्रवारी पहाटे भूस्खलनांमुळे टेकडीचा भाग एका घरावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिचा पतीला आणि तिच्य़ा २० वर्षांच्या मुलगीला अग्निशमन दलाच्या विभागाने आणि पोलिसांनी ढिगाऱ्याखालून काढले.
दुसर्या एका घटनेत, नारायणा या 45 वर्षीय व्यक्ती सुल्ल्या तालुक्यात नाल्यात वाहून गेला. पाण्याचा जोर वाढल्याने त्याला वाचवण्यात अपयश आले. कर्नाटकात 4 जुलै आणि 5 जुलै रोजी पावसाशी संबंधित घटनांमध्ये आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला असून, या पावसाळ्यात आतापर्यंत मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे.