कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी 1 टीएमसीने वाढली आहे. कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक पाणी सोडले जात आहे. सध्या धरणात 16 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
सातारा जिल्ह्यात कोयनानगरमध्ये 74 मिलीमीटर, नवजात 118 मिलीमीटर , आणि महाबळेश्वरात 129 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात प्रतिसेकंद 14 हजार 152 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली. तर गेल्या चोवीस तासात धरणात प्रतिसेकंद 14 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.
Previous Articleगणपती मंदिर पुलावर वाहतुकीची कोंडी कायम : ट्रॅफिक पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Next Article मळवली पाटण येथील अनधिकृत बांधकामांवर PMDRA चा हातोडा








