हवामान खात्याकडून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी
पणजी : पावसाने किंचित उसंत घेतली, मात्र दिवसातून तीन वेळा जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधारपणे बरसला. पावसाचे प्रमाण कमी झालेलेच नाही. गेल्या 24 तासांमध्ये 2 इंच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 4 इंच सांखळीत पडला. हवामान खात्याने ऑरेंज अलर्टच्या तारखेमध्ये वाढ कऊन आता दि. 26 जुलैपर्यंत निश्चित केला आहे. या काळात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 2 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात पडलेल्या एकूण पावसाची नोंद आता सरासरी 106.50 इंच एवढी झाली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा गोव्यातील अनेक भागांना पावसाने झोडपले. यंदा जुलैमध्ये पावसाने कहरच केलेला आहे. यंदाच्या मौसमात 39 इंच म्हणजेच 57 टक्के जादा पाऊस पडलेला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. हवामान केंद्रांमध्ये झालेली नोंद पुढीलप्रमाणे (इंचामध्ये) :
- म्हापसा 2.50
- पेडणे 1.25
- फोंडा जवळपास4 इंच
- जुनेगोवे 3.50
- सांखळी 4.25
- वाळपई 1
- काणकोण 1
- दाबोळी 0.75
- मडगाव 1.50
- मुरगाव 1.50
- केपे 1.50
- पणजी 2
- सांगे 3
यंदाच्या मौसमी पावसाचे वैशिष्ट्या म्हणजे अल्पावधीत वाळपईत 124 इंच, सांगे 120 इंच, सांखळी 118 इंच तर फोंडा येथे 113 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे.









