Kolhapur Rain Update : गेल्या पंधरा दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आज सायंकाळपासून कोल्हापुरात पावसाने जोर धरला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानं पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाने अचानक दडी मारल्याने भात पिक वाळणीला लागले होते. यामुळे शेतकरी चिंतेत होता. तर गेल्या चार दिवसांपासून वातावरणात उष्मा खूप होता. पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर अचानक पाऊस आल्याने नागरीकांची काहीकाळ धांदल उडाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









