पाऊस ऊस पिकांसाठी अत्यंत लाभदायक
वार्ताहर /कुद्रेमनी
गुरूवारी दुपारनंतर कुद्रेमनी गाव परिसरात जोराचा पाऊस पडला. शेतकरी वर्गातून शेती कामांसाठी पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त होत्या. एक दिवसाआड सलग तीन दिवस या भागात पाऊस झाला. हा पाऊस शेतातील ऊस पिकांसाठी अत्यंत लाभदायक असून बि-बियाणांची पेरणी करण्यापूर्वी शेतीच्या मशागतीसाठी पाऊस चांगलाच झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या या भागातील शिनोळी, जंगमहट्टी आदी गावात यात्रोत्सव होत आहेत. पावसामुळे ग्रामस्थ, येणारे-जाणारे पै पाहुणे यांना त्रास सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. दुपारी जोराचा वारा व पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या व रस्त्यावर झाडांची पडझड होवून रहदारीला अडचण निर्माण झाली. मात्र पाऊस पडल्याचे समाधान व्यक्त होत आहे.









