Kolhapur Rain Update : जिल्ह्यात कालपासून धरणक्षेत्रासह अन्य भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई व इचलकरंजीसह काल 1 1 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पातळी 22.6 फुटावर असून, जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आज सकाळपासून जिल्ह्यातील पावसाचे अपडेट
करवीर: जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली
शाहूवाडी: मलकापूर अनुस्कुरा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक अंशतः बंद
आजरा : किटवडे धरण वाहतूक मार्गांवर पाणी आल्याने अंशतः वाहतूक बंद
सालगाव पुलावर पाणी आल्याने पर्यायी सोहाळे मार्गाने वाहतूक सुरू
भुदरगड: रांगणा किल्ल्यावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुखरूप सुटका
पन्हाळा: पिसात्री येथील जांभळी नदीच्या पुलावर चार फूट पाणी, पडसाळी मार्गे वाहतूक बंद
भोगावती नदी पात्रात वाढ होण्याची शक्यता
राधानगरी धरणातून सुरु असलेला 700 क्यूसेक असणारा विसर्ग 300 क्यूसेकने वाढवून 1000 क्यूसेक इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात आज सकाळी 10:00 वा सोडण्यात आला. ओढ्याचे व नदी नाल्याचे पाणी भोगावती नदी पात्रात मिसळत असल्याने व धरणातील विसर्ग वाढवल्याने भोगावती नदी पात्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
पडसाळी मार्गे वाहतूक बंद
पिसात्री येथील जांभळी नदी पुलावर 4 फुट पाणी असलेने काळजवडे पोंबरे पडसाली रोड मार्गे पिसात्रीमध्ये येणारा रस्ता बंद आहे. सध्या पिसात्री- पाट पन्हाळा मार्गे वाहतूक सुरु आहे.धरणाचा पिलर ढासळल्यामुळे किसरुळ मार्गे प्रवास करु नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.








