नदी-नाल्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : तालुक्यातील शाळांना आज सुटी, तालुक्यातील जनजीवन ठप्प
खानापूर : खानापूर तालुक्मयात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुऊवात झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. तालुक्यातील सर्वच नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्मयातील अनेक गावांचा संपर्क खानापूरशी तुटलेला आहे. तर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली असून आतापर्यंत सात घरांची पडझड झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले असून रविवारच्या बाजारावरही परिणाम दिसून येत होता. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तालुक्मयातील सर्वच नदी-नाले धोक्मयाच्या पातळीवरून वाहत आहेत. खानापूर येथील मलप्रभा नदीघाट पाण्याखाली गेला असून ब्रिजकम बंधाऱ्याच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात झाडे, फांद्या अडकल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्मयता आहे. पश्चिम भागात याच पद्धतीने पुढील दोन-तीन दिवस पाऊस राहिल्यास पुन्हा महापुराचा धोका आहे. सद्याच्या पावसामुळे शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने तलावाचे स्वऊप आले आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील खागी (बांध) पडत आहेत. यामुळे भात पिकाचे नुकसान होत आहे.
तालुक्मयातील हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर तीन ते चार फूट पाणी आल्याने हा रस्ता पोलिसांनी पुन्हा वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे या भागातील 25 खेड्यांचा खानापूरशी संपर्क आता असोग्यावरून होत आहे. त्याचप्रमाणे कुप्पटगिरी गावचा जुना रस्ताही पाण्याखाली गेल्याने तोही रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तालुक्मयातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क पावसामुळे तुटलेला आहे. रविवारी बाजारचा दिवस मात्र जोरदार पावसाने बाजारही ठप्प झाला. तसेच तालुक्मयातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सायंकाळी पावसाचा जोर कायम होता. सोमवारी जर याच पद्धतीने पाऊस सुरू राहिल्यास महापुराचा धोका व्यक्त होत आहे. सध्या तालुक्मयातील सर्वच नदी-नाले, दुथडी भरून धोक्मयाच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणाही महापुराचा सामना करण्यासाठी सतर्क झाली आहे. काही दुर्घटना घडल्यास खानापूर तहसीलदार कार्यालय दूरध्वनी क्रमांक 08336-222225 यावर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.
पाऊस भात पिकासाठी पोषक
तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यासह तळी तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतातही पाणीच पाणी झाले असल्याने शेतकऱ्यांची कामेही सध्या ठप्प झाली आहेत. भात लावणीचा हंगाम आता सुरू होणार होता. मात्र जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपली भातरोप लावणी थांबविली आहे. होणारा पाऊस हा भात पिकासाठी पोषक आहे. पुढील चार दिवस याचपद्धतीचे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त होत आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळांना सुटी जाहीर केली आहे. तालुक्यातील पावसाच्या बाबतची माहिती तालुका शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळांना सुटी जाहीर केली आहे.
वीजपुरवठा खंडित, नागरिकांना त्रास
तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामीण भागातील वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून बंद आहे. तर शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युतपुरवठा सुरळीत होण्यासाठी हेस्कॉमने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने अनेक गावांचा विद्युतपुरवठा बंद झाला आहे.









