चिकोडी शहर व परिसरात सोमवारी अचानक विजेच्या गडगडटासह सायंकाळी वळीवाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढला होता. आज सायंकाळी आलेल्या वळीवाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून सतत ढगाळ वातावरण होत होते. पण पावसाने हजेरी लावली नव्हती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ऊन सावलीचा खेळ चालू होता. सायंकाळी सहाच्या सुमारास चिकोडी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.