म्हैसाळ वार्ताहर
मिरज तालुक्यातील नरवाड येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झालेने पानमळे, केळीच्या बागा व द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. विशेषता नरवाडच्या लक्ष्मीनगर भागात अधिक गारा पडल्या आहेत. बहुतांश शेतकरी द्राक्षबागांच्या छाटणी केल्या असून आता फुटवे येत आहे. अशा वेळी गारपीट झालेने त्याचा परिणाम बागेवर झाला आहे.याशिवाय पानमळे सभोवती संरक्षण व आधारासाठी असलेले शेवग्याची झाडे वाऱ्याने मोडून पडली आहेत. परिणामी पानमळ्यांचेही नुकसान झाले आहे. याची तातडीने पहाणी करून पंचनामे करावीत अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.