पुणे / प्रतिनिधी :
राज्यात पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून, पुणे, सातारा, पालघर, रायगडला रेट अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, येत्या 48 तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. दक्षिण छत्तीसगड ते लगच्या भागावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यात पुणे, सातारा, पालघर, रायगडला बुधवारी अतिवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक जिल्हय़ात दमदार पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
बुधवार ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
गुरुवार ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर
शुक्रवार ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
शनिवार ऑरेंज अलर्ट
पुणे, रायगड








