चौके /वार्ताहर
चौके गावात गेले तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौके सम्यक नगर (चौके हायस्कूल जवळ) येथील रहिवासी श्रीमती कांचन काशीराम कदम यांच्या घराचे छप्पर कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . छप्पर कोसळल्याची माहिती मिळताच चौके सरपंच पी.के. चौकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तलाठी श्री गुरव आणि पोलिस पाटील श्री. रोहन चौकेकर यांच्याशी संपर्क साधून पाहणी करण्यात आली. तसेच कोसळलेल्या छप्पराचे पंचायत यादी करण्यात आली नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी असे आवाहन सरपंच श्री. चौकेकर यांनी केले आहे . श्रीमती कांचन कदम यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब असून कोसळणार्या पावसामुळे त्यांचे राहते घर जमीनदोस्त झालेले असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.









