सखल भारात पाणीच पाणी : ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान : दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला

बेळगाव : जोरदार वाऱ्याबरोबरच ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटासह दमदार वळिवाने सोमवारी शहरासह परिसराला झोडपले. यामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तसेच काही ठिकाणी गटारी भऊन रस्त्यावर पाणी आले होते. सखल भागामध्ये पाण्याबरोबर कचरा वाहून आल्याने अनेक ठिकाणी कचराच कचरा साचल्याचे दिसून आले. रात्री 8 च्या सुमारास शहर आणि ग्रामीण परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये वाढ झाली होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री 8 च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. जोरदार वारा व गडगडाटासह पावसाला सुऊवात झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे व फांद्याही तुटून पडल्या. यामुळे काही भागामध्ये विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला होता. रात्री 8 ते 9.30 या वेळेत पावसाला सुऊवात झाल्याने याचा परिणाम बाजार पेठेवरही झाला होता. या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गोवावेस, पॅम्प परिसर, ग्लोब थिएटर, अग्निशामन दलाच्या कार्यालयासमोर तसेच चन्नम्मा सर्कल आदी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. यामधून वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. यामधून वाहन नेताना इतर वाहनांवर पाणी उडत होते. टिळकवाडी भागातही बऱ्याच ठिकाणी रस्त्यावऊनच पाणी वाहताना दिसत होते. गटारी व ड्रेनेजचे पाणी रस्त्यावऊनच वाहत होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या पाण्यातूनच पादचाऱ्यांना वाट काढावी लागत होती. पावसामुळे तुंबलेल्या या पाण्यातून वाट काढण्यासाठी बरेचजण हातीत चप्पल घेवूनच वाट काढत असल्याचे चित्र दिसत होते. गटारीतील प्लास्टीक पिशव्या इतर साहित्य पावसामुळे रस्त्यांवर आले होते. परिणामी जोरदार वारा असल्यामुळे अनेकांना आडोसा शोधावा लागला.

सर्वत्र पाणीच पाणी
शहरातील माऊती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, रविवार पेठ, कलमठ रोड, या परिसरात गटारी तुडूंब भऊन पाणी रस्त्यावऊन वाहताना दिसत होत्या. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भाजी विकणाऱ्या महिलांनाही पावसाचा फटका सहन करावा लागला. अचानक पावसाला सुऊवात झाल्याने त्यांची तारांबळही उडाली. बाजारपेठेतील फेरीवाले, भाजी विक्रेते व इतर विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल दीड तास झालेल्या या जोरदार पावसामुळे बऱ्याच जणांना पाऊस जाण्याची वाट पहावी लागली. वाहन चालकांनाही भिजतच घरी जावे लागत होते. काहीजण आडोसा घेऊन पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान अनेकांना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच थांबणे पसंत. केले होते. जोरदार वारा असल्यामुळे बरीच समस्या निर्माण झाली होती.
पावसाला सुऊवात झाल्यानंतर जोरदार वारा, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटामुळे अनेक जण घराबाहेर न पडणेच पसंत केले होते. अनेक जणांनी आपल्या घरांचे दरवाजे बंद केले होते. शहराबरोबरच उपनगरांनाही वळिवाने झोडपले. जोरदार वाऱ्याबरोबरच वळिवाचे आगमन झाल्याने काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही झाडांच्या विद्युत तारांवर फांद्या तुटून पडल्या. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी या फांद्या बाजूला कऊन त्यानतंर त्या विद्युत तारांची दुऊस्ती कऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. भकरी मंडई येथील मराठी शाळेसमोर कारवर झाड कोळल्याने नुकसान झाले.
पाऊस झाल्याने बऱ्याच जणांनी मागील वर्षी पाऊस संपल्यानंतर ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढले. पाऊस आल्याने ताटकळत थांबलेल्या वाहन चालकांनी सोमवारी रेनकोटासहच बाहेर पडले होते. यामुळे बऱ्याच जणांनी तातडीने हे रेनकोट परिसराधान कऊन पावसातून वाट काढत होते. मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाच्या पाण्यातून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. वाहने सावकाश चालवावी, लागत होती. बऱ्याच जणांनी वाहने रस्त्यावरच पार्किंग कऊन पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घेतला होता.
या झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तर आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करुन तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उष्म्यात मोठी वाढ झाली होती. यामुळे सर्वांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. त्यामुळे पाऊस कधी होईल, असे साऱ्यांना वाटत होते. दरम्यान सोमवारी झालेल्या पावसामुळे उष्म्यापासून काहीशी विश्रांती मिळाली. पावसापूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील छपरे व पत्रे उडून गेले आहेत. या घरात राहिलेल्या नागरिकांचा संसारच उघड्यावर आला. तर मुख्य रस्त्यावरच झाडे कोसळल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाल्याचेही दिसून आले. येथील नागरिकांनी ते झाड बाजुला साऊन ये-जा करण्यास वाट कऊन दिली. याचबरोबर शिवारांतही मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. हा पाऊस मशागतीसाठी फायदेशी ठरला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावले असले तरी अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. सध्या शेतकरी शिवारातील गवत घराकडे आणून ठेवण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर शेणखतही शिवारात सोडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. आता चार दिवसात मशागतीचे कामे उरण्याच्या घाईगडबडीत शेतकरी दिसणार आहेत. वळिवाचा पाऊस बहुतेकवेळा दुपारीच कोसळतो. मात्र सोमवारी अचानक रात्रीच्यावेळी पावसाला सुऊवात झाल्याने सारेच जण मान्सूनचे आगमन झाले काय? असाच प्रश्न उपस्थित करत होते.
खडेबाजार पोलीस स्थानकासमोर कोसळले झाड
सोमवारी सायंकाळच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर खडेबाजार पोलीस स्थानकासमोर असलेले झाड आलेल्या जोरदार पावसामुळे कोसळले आहे. यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले आहे. याचबराब्sार अनेक ठिकाणीही पावसामुळे झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.
कडोली भागात दमदार पाऊस
वळिवाने सोमवारी सायंकाळी सुरू केलेल्या दमदार पाऊस कडोली भागातही कोसळला आहे. कडोली भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून अनेक वृक्षे कोसळली आहेत. तर काही घरांवरील पत्रेही उडाल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.









