Heavy polling in Minister Ravindra Chavan’s Sasurwadi
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सासुरवाड असलेल्या नेमळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले . सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेव्हणे विद्यमान सरपंच विनोद राऊळ यांनी माजी जिल्हा बँक संचालक गुरुप्रसाद नाईक यांच्या साथीने गाव विकास पॅनल निवडणुकीत उभे केले आहे तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उत्कर्ष परिवर्तन पॅनल उभे केले आहे . हा विकास पॅनलच्या तेजस्वी वेंगुर्लेकर तर उत्कर्ष परिवर्तन पॅनलच्या दीपिका भैरे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीने झाली गट निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घालून ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आणली होती त्यांचे मेव्हणे सरपंच झाले. चव्हाण यांची सासुरवाड असल्याने या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. ग्रामपंचायत निवडणूक चुरशिने झाल्याने निकाल काय लागतो याकडे ग्रामस्थांचेही लक्ष आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









