गाडीचे मोठे नुकसान । सुदैवाने जीवितहानी नाही
कोलगाव येथे मिया साब समाधी जवळ कॅन्टर आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार मध्ये झालेल्या अपघातात ड्रायव्हर सह अन्य किरकोळ जखमी झाले. अपघात एवढा भयंकर होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे . अपघातग्रस्त कार सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती. तर कॅन्टर सावंतवाडीच्या दिशेने येत होता. मियासाब समाधी जवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.









