चाऱ्याचा प्रश्न गंभीर : भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे महामार्गाचे काम करताना गटारी न बांधल्याने पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचले आहे. सदर पाण्यामुळे गवतगंज्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एससी मोटर्स ते निलजीपर्यंतच्या महामार्गाचे काम सात-आठ महिन्यापासून सुरू आहे. सदर काम करताना गटारींची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला मोठ्याप्रमाणात साचले आहे. सदर पाणी काही ग्रामस्थांच्या घरातही घुसले आहे. या पाण्यामुळे परसात असलेल्या गवतगंज्यांचे मेठे नुकसान झाले आहे. याबाबत नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गटारीचे काम लवकर करून पाण्याचा निचरा करावा व संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.









