लंडन
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये हीथ्रो विमानतळ शुक्रवारी बंद राहिला आहे. विमानतळानजीक एका इलेक्ट्रिक सबस्टेशनला आग लागल्याने हे घडले आहे. आग लागल्यामुळे विमानतळाला वीजपुरवठा होऊ शकला नाही. पश्चिम लंडनच्या हेसमध्ये आग लागली असून यामुळे 16 हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली आहे. तर हीथ्रो विमानतळाने प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले. हीथ्रो हे ब्रिटनमधील सर्वात मोठे विमानतळ असून तेथे दरदिनी सुमारे 1300 लँडिंग आणि टेकऑफ होत असतात.









