पुणे / वार्ताहर :
उत्तर भारतातील मैदानी राज्ये तसेच पूर्व भागात उष्णतेची लाट पसरली असून, पुढील दोन दिवस ती कायम राहणार आहे. सोमवारी ओरिसातील बारीपाडा येथे सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, सिक्कीम याबरोबरच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. पूर्व तसेच मध्य भारतातील अनेक भागांत 40 ते 44 अंश सेल्सिअसदरम्यान कमाल तापमान नोंदविण्यात आले. दोन दिवस ही लाट कायम असेल.मध्य भारतात पुढील दोन दिवस कमाल तापमान कायम राहणार असून, त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसने घटण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा तसेच विदर्भात उष्णतेची लाट दिसून आली. अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्अिसच्या दरम्यान आढळून आला. राज्याच्या अनेक भागात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता असून, दोन दिवसांनंतर कमाल तापमान किंचित घटण्याची शक्यता आहे.








