Heat Stroke News: उत्तर भारतातील मैदानी राज्ये तसेच पूर्व भागात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी खारघरच्या कॉर्पोरेट पार्क मैदानावर उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडते तोच कोल्हापुरातील बेलवडे खुर्द ता. कागल येथे सोमवारी ( ता. 17 ) रोजी दोन महिला आणि आणखी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्याचे सध्या तापमान 40 अंश सेल्सिअस एवढे वाढले आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे.उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नेमके काय उपाय करावेत हे आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर उष्माघाताची कारणे , लक्षणे आणि उपायाविषयी जाणून घेणार आहोत.
उष्माघाताची लक्षणे
वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
उन्हात घराबाहेर पडताना अशी घ्या काळजी
उष्माघात होवू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या
घरात अथवा घरातून बाहेर पडताना सुती कपड्यांचा वापर करा
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी चा वापर करा
सोबतच बूट किंवा चप्पलचा वापर करा
प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.
आहारात याचा करा वापर
उन्हाळा वाढल्याने फ्रिजमधील अतिथंड पाण्याचा वापर केला जातो. यापेक्षा माठाचा वापर करा. शक्य असल्यास अतिथंड पाणी पिऊ नका
रस्त्यावरील बर्फ घातलले ताक, लस्सी, सरबत आणि इतर पदार्थ टाळा
यापेक्षा घरातील फ्रेश ताक प्या.
आहारात पालेभाज्या, कडधान्य आणि फळांचा वापर वाढवा.
इतक सगळ करूनही जर तुम्हाला उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तात्काळ जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









