बेळगाव : सातासमुद्रापार असलेल्या इराकमधील सहा वर्षीय अझल अली सुफी या मुलीवर अरिहंत हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व सर्जन डॉ. एम. डी. दिक्षित यांनी या इराकी कन्येवर शस्त्रक्रिया करुन तिला पुनर्जीवन दिले. यापूर्वी अरिहंत हॉस्पिटलमध्ये इराकमधील दोन रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सदर कन्येच्या पालकांकडे अनेक देशांचे पर्याय असताना त्यांनी भारतातील बेळगावचे डॉ. एम. डी. दिक्षित यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करुन घेतली. 2018 मध्ये या मुलीवर झडपेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र 2023 मध्ये पुन्हा तिला त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांना दाखविताच तिला सबआयोटीक मेब्रन्स आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारात हृदयातील जो पडदा महाधमनीच्या खाली असून त्यामुळे डाव्या बाजूच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. पालकांनी यासाठी योग्य उपचार कोठे होतील, याचा शोध घेतला तेव्हा बेंगळूरच्या एका परिचिताने त्यांना डॉ. एम. डी. दिक्षित यांचे नाव सुचविले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. दिक्षित यांनी आमच्या मुलीला नवजीवन दिले आहे असे त्या मुलीचे वडील साबीअली सुभी यांनी सांगितले. या हॉस्पिटलचे चेअरमन रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन व उत्तम पाटील यांनी सदर मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करुन तिला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
Previous Articleसिल्व्हर महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Next Article प्रसन्ना घोटगे यांचा वाढदिवस साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









