आलिया भट्ट व्हिलनच्या भूमिकेत
नेटफ्लिक्सने स्वत:चा स्पाय-अॅक्शन चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर सादर केला आहे. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट ही हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेनी डॉर्नन मुख्य भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट यात व्हिलनच्या भूमिकेत आहे.
हार्ट ऑफ स्टोन चित्रपटात गॅल गॅडोट ही सिक्रेट एजंटची भूमिका साकारत आहे. आलियाने सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर समोर येताच आलियाला नकारात्मक धाटणीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टॉप हार्पर यांनी केले आहे. चित्रपटात सोफी ओकोनेडो, मथियास श्वेघोफर, जिंग लुसी अन् पॉल रेडी हे कलाकार देखील दिसून येणार आहेत.
आलिया यापूर्वी अयान मुखर्जीकडून दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसून आली होती. आलिया लवकरच करण जौहरकडून दिग्दर्शित होणाऱ्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तसेच जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र देखील यात दिसून येतील. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर आलिया ही जी ले जरा या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कॅटरीना कैफ अन् प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारत आहे.









