पेठ वडगाव प्रतिनिधी :
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत आज १० एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही. अशातच आणखी एक नवी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली होती .१० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी पार पडेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली आठ महिने ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जात आहेत. 28 मार्च रोजी याबाबत सुनावणीची तारीख होती, मात्र घटनापीठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही. २३ मार्चला सकाळी याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली . यावेळी १० एप्रिल तारीख न्यायालयाने दिली .आज सुनावणी पूर्ण होते की आणखी तारीख मिळते? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Articleकाणकोणातील रवींद्र भवनाचे काम पाच वर्षांनंतरही अपूर्ण
Next Article गोव्याचे माजी क्रीडा संचालक रॉक डायस यांचे निधन









