प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर शहरविकास प्राधिकरणात (मुडा) घोटाळ्या प्रकरणी खटला चालविण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी सरकारची बाजू मांडणार आहेत. याशिवाय 12 सप्टेंबरलाही वादाची मालिका सुरू राहणार आहे. त्यादिवशी अभिषेक मनु सिंघवी मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतील. त्यामुळे सोमवारी उच्च न्यायालय आदेश देण्याची शक्मयता कमी आहे.









