कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी दाखल गुह्यातील संशयीत प्रशांत कोरटकर (मुळ रा. माहुर, सध्या रा. नागपूर) याने अटकपूर्व जामिनअर्ज मिळावा. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून, अर्ज दाखल केला आहे. या दाखल अर्जावर 24 रोजी सुनावणी होणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अंतरिम अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावला. त्यानंतर जुना राजवाडा आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाचे एक पथक त्वरीत त्याच्या शोधासाठी नागपूरकडे रवाना झाले. या पथकातील पोलिसांच्याकडून त्याचा नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई शहरात शोध घेतला जात आहे.
याचदरम्यान कोरटकरने अटकपूर्व जामिन मिळावा. याकरीता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून, अटकपूर्व जामिनअर्ज दाखल केला आहे. या दाखल अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी वेळी तो न्यायालयात हजर राहणार की गैर राहणार याकडेही पोलिसाचे लक्ष्य लागून राहिले आहे.








