Local Self-Government Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत 18 जुलैला सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी तारीख निश्चित करण्यात आलीयं. 18 जुलैला महापालिका निवडणुकांचं भवितव्य निश्चित करणारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर महानगरपालिका,नगरपालिका, जिल्हा परिषदेचं भवितव्य अवलंबून आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर क्रमांक दोनवर हे प्रकरण आहे.
राज्यातील अनेक महानगरपालिका,नगरपालिका,नगर परिषदांचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे इथला संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे. 18 जुलैला होणारी सुनावणी यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 207 नगरपालिका,पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.








