निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाच्या झोळीत टाकल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आमदारांच्या आपात्रते संबंधाची सुनावणी सुरु आहे. आज सुनावणीच्या दुसऱ्या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे जेष्ट वकिल कपील सिब्बल यांनी युक्तीवादाला सुरवात केली आहे.
सरन्यायाधीशांनी सादर केलेले पत्र मराठीमध्ये वाचून त्याची शहानिशा केली. त्यांनंतर पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले असल्याचे आणि त्याला इतरांनी त्याला अनुमोदन दिले असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
सुरवातीलाच कपील सिब्बल यांनी सरन्यायधीशांसमोर काही गोष्टींचा उलगडा केला. 29 जूनच्या बहूमत चाचणीवर चर्चा करून त्यानंतरच ठाकरेंनी राजीनामा दिला आहे.
शिवसेनेमध्ये गटनेते आणि पक्षप्रतोद निवडण्याचा अधिकार कोणाचा असा सवाल केल्यावर कपील सिब्बल यांनी हा अधिकार पक्षप्रमुख या नात्यांने उद्धव ठाकरे यांनाच असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या पदावर स्वता उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली होती. तसेच पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत होते. असा खुलासा केला.
शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड 31 ऑक्टोबर 2019 ला उद्धव ठाकरे यांनीच केली.