Ots chila : डायट प्रेमींसाठी ओट्स हेल्दी आणि फायदेशीर असते. ओट्स वजन कमी (करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. पण नाश्त्यामध्ये नेहमी फक्त ओट्स खाऊन बोअर होते. त्यामुळे तुम्ही ओट्सची अनोखी डिश खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला ओट्स चिला कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेऊया.
साहित्य
ओट्स -२ वाटी
बेसन – २ चमचे
रवा – २ चमचे
बारीक चिरलेला कांदा – २ चमचे
जिरे पूड – १ चमचा
आमचूर पावडर – अर्धा चमचा
आले
हिरवी मिरची
बारीक चिरलेली शिमला मिर्च – २ चमचे
चिरलेला टोमॅटो – २ चमचे
मीठ
हळद
पाणी
लालतिखट १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
कृती
सर्वप्रथम ओट्स कोरड्या पॅनमधे २-३ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्या. यानंतर एका भांड्यात काढून घ्या. थोडे थंड झाल्यानंतर त्यामध्ये रवा, बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आले आणि मिरचीची पेस्ट, हळद, जिरेपूड, आमचूर पावडर, लाल तिखट हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या.त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला.मिश्रण धिरडे किंवा आंबोळीच्या पिठासारखे सरसरीत झाले की दहा मिनिटं सर्व मिश्रण थोडं भिजू द्या.नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला.त्यानंतर तवा तापवून, थोडंसं तेल लावून तव्यावर छोटे छोटे डोसे घातल्याप्रमाणे चिला घालून घ्या.दोन्ही बाजूंनी नीट भाजले की हिरवी चटणी किंवा रायत्याबरोबर खायला द्या.
Previous ArticleKarnataka : युतीसाठी दरवाजे खुले…पण अट एकच- कुमारस्वामी
Next Article ‘मंडलिक’,‘बिद्री’ बिनविरोधसाठी प्रयत्न करणार









