मोमोज हा पदार्थ विशेष करून लहान मुलांना फार आवडतो. पण मैद्यापासून बनलेले मोमोज सारखे खाणं शरीराला अपायकारक ठरू शकतं.पण याला पर्याय म्हणून आपण घरच्या घरी रव्याचे मोमोज बनवले तर ते तितकेच टेस्टी आणि हेल्दी असतील. चला मग जाणून घेऊया व्हेज मोमोज बनवण्याची सोपी पद्धत…
साहित्य
रवा
पाणी
मीठ
तेल
आले लसूण मिरची पेस्ट
बारीक चिरलेलं गाजर
बारीक चिरलेला कोबी
बारीक चिरलेला कांदा
मिरी पावडर
कृती
सर्वप्रथम १ कप रव्यामध्ये १ चमचा मीठ टाकून मिक्सरमध्ये वाटून त्याची गुळगुळीत पावडर बनवून घ्या. यांनतर वाटलेला रव्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पिठावर थोडे तेल लावून झाकण ठेवून २० ते ३० मिनिटे बाजूला ठेवा.आता स्टफिंगसाठी कढईत १ टेबलस्पून तेल टाका. यानंतर त्यामध्ये २ चमचे आले,लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला. आणि सर्व मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. काही वेळ भाजल्यानंतर या मिश्रणात अर्धी वाटी चिरलेला गाजर, १ वाटी कोबी आणि १ वाटी बारीक चिरलेला कांदा घालून सर्व काही नीट मिक्स करून मंद आचेवर परतून घ्या.आता त्यामध्ये १ टीस्पून काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. थोडा वेळ भाजल्यानंतर सारण बाजूला ठेवा.आता एका पातेल्यात पाणी घालून गरम करा. आणि त्यावर चाळणी ठेवा आणि तेलाने ग्रीस करा.आता मळून ठेवलेल्या पिठाचा गोळा करून लाटून घ्या. आता चमच्याच्या साहाय्याने सारण मध्यभागी ठेवून मोमोच्या कडा एकत्र चिकटवा.यांनतर हे सर्व मोमोज चाळणीवर ठेवा आणि १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. तयार झालेले चविष्ट आणि हेल्दी मोमोज चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









